Rishabh Pant च्या पुनरागमनाची जोरदार तयारी! लवकरच होऊ शकतो Team India मध्ये एन्ट्री (Watch Video)

हा इतर व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये पंत जबरदस्त कसरत करताना दिसत आहे.

Rishabh Pant Video: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातानंतर टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. या कार अपघातात एका बाजूला ऋषभ पंतची कार जळून खाक झाली, तर दुसरीकडे पंत गंभीर जखमी झाला. आता त्याच्या संघात पुनरागमनाच्या चर्चा सुरू आहेत. कारण पंत आता पूर्णपणे बरा झाला आहे पण संघात पूर्ण पुनरागमन करण्यासाठी त्याने अद्याप फिटनेस परत मिळवलेला नाही. त्यासाठी आता ऋषभ पंत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जोमाने काम करत आहे. ऋषभ पंतचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत आहेत. आता पंतचा असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचा वर्कआउटचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा इतर व्हिडिओंपेक्षा खूप वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये पंत जबरदस्त कसरत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून टीम इंडिया आणि पंतच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. (हे देखील वाचा: Rahul Dravid Visit Chamundi Hills: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्नीसह पोहोचला चामुंडी हिल्सवर)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)