PM Modi In Indian Team Dressing Room: 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रेसिंग रूम मध्ये येणं खास आणि मनोधैर्य वाढवणारं' - Ravindrasinh jadeja ने शेअर केली खास पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये येत खेळाडूंचे मनोधैर्य वाढवल्याचे रविंद्र जडेजाने एका पोस्ट मध्ये लिहले आहे.
सलग 10 सामने जिंकल्यानंतर वर्ल्ड कपचा अंतिम सामना गमावल्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सह सार्यांचाच हिरमोड झाला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ग्राऊंडवरून टीम इंडिया डोळ्यातले अश्रू लपवत ड्रेसिंग रूम मध्ये जाताना सारेच हिरमुसले होते. अशावेळी अंतिम सामना पहायला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये येत खेळाडूंचे मनोधैर्य वाढवल्याचे रविंद्र जडेजाने एका पोस्ट मध्ये लिहले आहे. यावेळी त्यांचे येणं खास होतं आणि सोबतच मनोधैर्य वाढवणारं होतं असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने पाठिंबा दिलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचेही आभार मानले आहेत. IND VS ASU ICC World Cup Final: टीम भारतने चाहत्यांचे मानले आभार.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)