PM Modi's Interaction With World T20 Champions: पंतप्रधान मोदींचा विश्वविजेत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा, एका क्लिकवर पाहा संपूर्ण व्हिडिओ

टीम इंडिया 4 जुलैला रोहित शर्मासोबत भारतात पोहोचली. दिल्ली विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Photo credit - X

PM Modi's Interaction With World T20 Champions: अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाने ही स्पर्धा जिंकली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. भारताच्या विजयाबरोबरच करोडो भारतीय चाहत्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. टीम इंडिया 4 जुलैला रोहित शर्मासोबत भारतात पोहोचली. दिल्ली विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडियाचा पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंच्या भेटीदरम्यान सर्वांशी चर्चा केली आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. ते आधी राहुल द्रविडशी आणि नंतर रोहित शर्माशी बोलले. यानंतर त्यांनी प्रत्येक खेळाडूशी बोलून त्यांच्याविषयी माहिती घेतली. या काळात टीम इंडियाचे खेळाडू खूप आनंदी दिसत होते.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)