PM Modi Meeting Team India In Dressing Room Video: वर्ल्ड कपच्या फायनल मधील पराभवानंतर टीम इंडियाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी ड्रेसिंग रूम मध्ये PM Modi आले तेव्हा... ( Watch Video)

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ड्रेसिंग रूम मध्ये टीम इंडियाची भेट घेतली होती.

Modi With Team India | X

ICC World Cup 2023 Finals मध्ये पराभवाचा सामना करताना ग्राऊंडवरच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. पण नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये स्वतः सामना पाहण्यासाठी हजर असलेले PM Modi नंतर थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यांनी प्रत्येक खेळाडूला धीर देत असं होतं तुम्ही 10 सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहात तुमच्याकडे देशाचे डोळे लागले आहेत असं म्हणत टीम इंडीयाचं मनोबल उंचावलं. त्यानंतर टीम इंडियाला दिल्लीत येऊन भेटण्याचं देखील आमंत्रण मोदींनी दिलं आहे. यावेळी मोहम्मद शामी, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केले. PM Modi In Indian Team Dressing Room: 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रेसिंग रूम मध्ये येणं खास आणि मनोधैर्य वाढवणारं' - Ravindrasinh jadeja ने शेअर केली खास पोस्ट .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now