Asia Cup मध्ये PAK विरुद्धच्या सामन्यापूर्वी Team India चे नव्या जर्सीत फोटोशूट (Watch Video)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल.
टीम इंडियाने त्यांच्या आशिया कप 2022 च्या मोहिमेच्या पहिल्या सामन्यापूर्वी गुरुवारी दुबईमध्ये सराव सत्रात भाग घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. मालिकेपूर्वी खेळाडूंनी फोटोशूटही करून घेतले आहे. ज्याचा व्हिडिओ IPL फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. स्टार फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार फोटोशूट करताना दिसले. यादरम्यान दिनेश कार्तिक आणि अश्विनही मस्ती करताना दिसले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)