PCB Appoints Grant Bradburn As Head Coach: पीसीबीने ग्रँट ब्रॅडबर्न यांची विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती, 2 वर्षांचा केला करार

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक मोठी घोषणा केली असून, त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रँट ब्रॅडबर्न यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी (Pakistan Team) पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे की टीम इंडिया (Team India) आशिया कपसाठी (Asia Cup 2023) पाकिस्तानला (Pakistan) जाणार नाही आणि ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर आयोजित केली जाईल. त्याचवेळी पाकिस्तानसमोर केवळ आशिया चषकच नव्हे तर 2023 च्या वनडे विश्वचषकाबाबतही (ODI World Cup 2023) पेच आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक मोठी घोषणा केली असून, त्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून ग्रँट ब्रॅडबर्न यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. पीसीबीने सांगितले की एका प्रक्रियेनंतर ग्रँट ब्रॅडबर्न यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्रॅडबर्न पुढील 2 वर्षांसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)