PCB ने ऑस्ट्रेलियन दिग्गज Matthew Hayden ची T20 विश्वचषकासाठी Mentor म्हणून केली नियुक्ती

हेडन गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा मार्गदर्शकही होता. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला.

PCB ने ऑस्ट्रेलियन दिग्गज Matthew Hayden ची T20 विश्वचषकासाठी Mentor म्हणून केली नियुक्ती
Matthew Hayden (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानची नजर आता आगामी टी-20 विश्वचषकावर आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेत त्यांना पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करायची आहे. म्हणूनच त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडनला (Matthew Hayden) आपला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. हेडन म्हणाला की, पाकिस्तान संघात अनेक चांगले खेळाडू आहेत आणि ते पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकात चांगली कामगिरी करतील. हेडन गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा मार्गदर्शकही होता. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2022 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).