Coronavirus विरुद्ध लढ्यात भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले 13 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, व्हिडिओ शेअर करत केली अपील
ऑस्ट्रेलियन पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी कोविड-19 विरुद्ध भारताला मदत करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहेत आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे यावे आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाला उदारपणे दाब द्यावी अशी विनंती केली आहे.
ऑस्ट्रेलियन (Australia) पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी कोविड-19 (COVID-19) विरुद्ध लढ्यात भारताला (India) मदत करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहेत आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने पुढे यावे आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाला (UNICEF Australia) उदारपणे दाब द्यावी अशी विनंती केली आहे. UNICEF Australia ने पोस्ट केलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिग्गज अॅलन बॉर्डर, पॅट कमिन्स, मेग लॅनिंग यांच्यासह ऑस्ट्रेलियातील काही अव्वल क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, “भारतातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे” आणि “संकटकाळी आपल्याला एकत्र यावे लागेल.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)