PAKvsAUS: रावळपिंडी येथे पहिल्या कसोटीदरम्यान David Warner ने केले प्रेक्षकांचे मनोरंजन; दाखवली आपल्या नृत्याची झलक (See Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्नर प्रेक्षकांसमोर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना नाचताना दिसत आहे.

डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Twitter)

सध्या ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. तीन आठवड्यांमध्ये ही मालिका होणार आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसादरम्यान, मैदानावरील कॅमेऱ्यांनी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची एक झलक टिपली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्नर प्रेक्षकांसमोर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना नाचताना दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नर हा सोशल मीडिया खूप जास्त सक्रीय असून याआधी अनेकदा इंस्टाग्रामवर त्याच्या नृत्याचे व्हीडीओ त्याने पोस्ट केले आहेत. आता पाकिस्तानी प्रेक्षकांसाठी स्टेडियमवर त्याने लाइव्ह नृत्य दाखवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now