Sri Lanka Beat Pakistan: अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेकडून पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, आता फानयलमध्ये भिडणार भारताशी

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर या दोघांमध्ये सामना खेळला जात गेला.

आशिया कपच्या सुपर-4 फेरीत गुरुवारी (14 सप्टेंबर) श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 गडी राखुन पराभव केला आणि या विजयाने श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये भारताशी भिडणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर या दोघांमध्ये सामना खेळला गेला. पावसामुळे नाणेफेकीला बराच उशीर झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 42 षटकात 252 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर 252 धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने 52 धावांची खेळी केली. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचा प्रवास संपला आहे. श्वास रोखणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून श्रीलंकेने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. शेवटच्या 2 चेंडूत 6 धावांची गरज होती आणि असलंकाने संघाला विजय मिळवून दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)