T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा मिम किंग मोमीन साकिब (Momin Saqib) याने दोन्ही देशांच्या चाहत्यांना खास आवाहन केले आहे. मोमीन साकिब हा तोच व्यक्ती आहे जो 'ओ भाई मारो मुझे मारो' या व्हायरल व्हिडीओने प्रसिद्ध झाला होता. मोमीन अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतो. या शानदार सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना मोमीन साकिब म्हणाला, भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडत असल्याने चाहते खूप नाराज आहेत. मी त्यांना सांगितले की, पाकिस्तान आणि भारतातील लोकांनी बादल्या आणि वायपर घेवुन या, पाऊस पडला तरी आम्ही पाणी स्वतः काढू. मला खात्री आहे की पाऊस पडणार नाही. भारत-पाकिस्तानचा सामना छान होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)