IND A vs PAK A, ACC Asia Cup 2023 Toss Update: पाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

त्याचबरोबर पाकिस्तान अ संघ भारतावर मात करून सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

ACC Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली युवा भारत अ संघाने सलग पाच सामने जिंकले असून सहावा सामना जिंकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर पाकिस्तान अ संघ भारतावर मात करून सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानचा कर्णधार सॅम अयुबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कट्टर प्रतिस्पर्धी कोणत्याही परिस्थितीत एकमेकांविरुद्धचा सामना गमावू इच्छित नाहीत.

पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत अ: साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी, आरएस हंगरगेकर.

पाकिस्तान अ: सॅम अयुब (कर्णधार), हसिबुल्ला खान, मोहम्मद हारिस (विकेटकीप), कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहनवाज दहनी.