AUS vs PAK ICC World Cup 2023 Toss Update: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) आमनेसामने असतील. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

AUS vs PAK ICC World Cup 2023 Toss Update: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) आमनेसामने असतील. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज कोणताही संघ हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा नसेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसत असून सलग दोन सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. तर पाकिस्तान संघाने पहिल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).