Pakistan vs England: भर मैदानात शाहीन आफ्रिदीने बाबरला चिडवलं! ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बाबर आझमला झिम्बू, झिम्बाबर, झिमपाल या नावांनी हिणवलं जातं. कारण बाबर आझमची बॅट कायम दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध चालते. अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही आलेबेल नसल्याचे देखील समोर आले आहे.

Babar Azam (Photo Credit - Twitter)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट संघाला मुलतान येथे इंग्लंडकडून एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तान संघाला चांगलेच ट्रोल केले जात आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बाबर आझमला झिम्बू म्हणून हाक मारत असल्याचं दिसत आहे. या मागचे कारण म्हणजे बाबर आझमला झिम्बू, झिम्बाबर, झिमपाल या नावांनी हिणवलं जातं. कारण बाबर आझमची बॅट कायम दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध चालते. अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही आलेबेल नसल्याचे देखील समोर आले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now