T20 World Cup 2022: पाकिस्तानने T20 विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)
 पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) आज, गुरुवारी, 15 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 साठी राष्ट्रीय संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 2022 च्या T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचाही समावेश आहे, जो दुखापतीमुळे 2022 आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शान मसूदलाही संघात संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तान T20 विश्वचषक संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर

राखीव: फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहनी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)