India vs Pakistan, WCL 2024 Final Live Update: पाकिस्तानने टीम इंडियासमोर ठेवले 157 धावांचे लक्ष्य, अनुरीत सिंगने घेतल्या तीन विकेट
विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान चॅम्पियन संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या.
India vs Pakistan, WCL 2024 Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टूर्नामेंट 2024 अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवली जात आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आज भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान चॅम्पियन संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी शोएब मलिकने 41 धावांची शानदार खेळी केली. भारत चॅम्पियन्सकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. भारत चॅम्पियन्सला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 157 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)