India vs Pakistan: 'भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट संपेल', जाणून घ्या का व्हायरल होत आहे पीसीबी चेअरमनचा जुना व्हिडीओ
रमीज राजाच्या या धमकीदरम्यान त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
आशिया कप 2023 चे (Asia Cup 2023) यजमानपद पाकिस्तान (Pakistan) भूषवणार आहे. ही स्पर्धा खेळणाऱ्या सर्व संघांना पाकिस्तानला जावे लागेल, मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी टीम इंडियाच्या (Team India Tour Pakistan) पाकिस्तान दौऱ्याला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी पीसीबीने दिली आहे. रमीज राजाच्या या धमकीदरम्यान त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये रमीझ राजा भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट काही नाही, असे म्हणताना दिसत आहे. आयसीसीला भारतातून सर्वाधिक महसूल मिळतो. अशा स्थितीत पाकिस्तान क्रिकेट भारताशिवाय संपेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)