PAK Beat NED: विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 81 धावांनी केला पराभव, रिझवान-शकीलनंतर हरिस चमकला

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा (PAK vs NED) धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

PAK Beat NED: विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 81 धावांनी केला पराभव, रिझवान-शकीलनंतर हरिस चमकला

PAK vs NED World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव करत विश्वचषकाची विजयीने सुरुवात केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करत पाकिस्तानने नेदरलँडला 286 धावांचे लक्ष दिले. बास डी लीडेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 तर सौद शकीलने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर नेदरलँड्ससाठी बास डी लीडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ 41 षटकांत केवळ 205 धावा करू शकला. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक 67 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).