PAK vs NED: पाकिस्तानने नेदरलँड्सवर 6 विकेट्सने मात करत टी-20 विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला

नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून केवळ 91 धावा केल्या, जे पाकिस्तान संघाने 13.5 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2022 चा 29 वा सामना रविवारी पर्थ स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदरलँड्स (PAK vs NED) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 6 गडी राखून पराभव करत या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून केवळ 91 धावा केल्या, जे पाकिस्तान संघाने 13.5 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 49, फखर जमानने 20 आणि शान मसूदने 12 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. बाबरच्या T20 कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे की तो सलग तीन सामन्यांमध्ये 10 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now