IND vs PAK, Asia Cup 2022: सुपर-4 मध्ये पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने केली मात
फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोहम्मद नवाज झंझावाती खेळी खेळून बाद झाला. त्याने 20 चेंडूत 42 धावा केल्या. मोहम्मद रिझवान 71 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
आशिया चषक सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकांत 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 5 गडी गमावत 182 धावा करून सामना जिंकला. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. बाबर 14 धावा करून बाद झाला. फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोहम्मद नवाज झंझावाती खेळी खेळून बाद झाला. त्याने 20 चेंडूत 42 धावा केल्या. मोहम्मद रिझवान 71 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
ASIA CUP 2022. Pakistan Won by 5 Wicket(s) https://t.co/Yn2xZGToSl #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2022 11:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

