PAK vs AUS 2022: पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर; जोश हेझलवुड दुखापतीतून परतला तर स्कॉट बोलँड संघात कायम; पहा संपूर्ण टीम
24 वर्षात दोन्ही संघ पाकिस्तानच्या भूमीवर एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. 4 ते 25 मार्च दरम्यान दोन्ही संघात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत तीन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
24 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour of Pakistan) रवाना होणार आहे. यासाठी आता CA ने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18-सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने (Josh Hazlewood) नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेतील बहुतांश सामन्यातून बाहेर राहिल्यावर संघात परतला आहे तर डावखुरा फिरकी गोलंदाज अॅश्टन अगरचा (Ashton Agar) अतिरिक्त संथ गोलंदाजीचा पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी संघाची कमान हाती घेतलेला पॅट कमिन्स पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)