Virat Kohli Shows Empty Pockets to Crowd at SCG: वन मॅन शो! ऑस्ट्रेलियन चाहत्यांना विराट कोहली एकटा भिडला, सँडपेपरच्या घटनेची करून दिली आठवण

बुमराहच्या दुखापतीमुळे विराट कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. त्याने कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टच्या सँडपेपर घोटाळ्याची कॉपी केली. हा वाद 2018 मध्ये झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांचा समावेश होता.

Virat Kohli shows his empty pockets to SCG crowd (PC:X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीने (Virat Kohli) प्रेक्षकांना रिकामे खिसे दाखवून चिडवले. त्यांच्याकडे सँडपेपर नसल्याचं हे लक्षण होतं. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सकाळच्या सत्रात ही घटना घडली. बुमराहच्या दुखापतीमुळे विराट कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. त्याने कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टच्या सँडपेपर घोटाळ्याची कॉपी केली. हा वाद 2018 मध्ये झाला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बॅनक्रॉफ्टने चेंडू सँडपेपरने घासला होता. हे बॉल टेम्परिंगच्या श्रेणीत येते. यानंतर तिन्ही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement