NZ vs PAK 3rd T20 2024: न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव करत मालिका जिंकली

या मालिकेतील बाबरचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. न्यूझीलंडसाठी फिन ऍलनने या सामन्यात 62 चेंडूत 137 धावांची शानदार खेळी केली.

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला आहे. हा सामना जिंकून किवी संघाने मालिकाही जिंकली आहे. न्यूझीलंडने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने 7 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाला 7 गडी गमावून केवळ 179 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने 58(37) धावांची खेळी खेळली. (हेही वाचा - 6,6,6 Shivam Dube ने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर घेतली षटकारांची हॅटट्रिक! Rohit Sharma आणि Virat Kohli पाहतच राहिले (Watch Video))

या मालिकेतील बाबरचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. न्यूझीलंडसाठी फिन ऍलनने या सामन्यात 62 चेंडूत 137 धावांची शानदार खेळी केली. अॅलनने या खेळीत 5 चौकार आणि 16 षटकार मारले. या 24 वर्षीय फलंदाजाने T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now