NZ vs BAN 2022: भारताविरुद्ध सर्व 10 विकेट घेणाऱ्या Ajaz Patel याला न्यूझीलंडने दिला डच्चू, बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी केले दुर्लक्ष

भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट्स घेऊन इतिहास रचणारा फिरकी गोलंदाज एजाज पटेलला न्यूझीलंडच्या मायदेशात बांगलादेशविरुद्ध पुढील मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. 33 वर्षीय एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज होता आणि त्याने सामन्यात एकूण 14 विकेट घेत दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी बजावली.

एजाज पटेल (Photo Credit: PTI)

भारताविरुद्ध डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबई कसोटीत (Mumbai Test) एका कसोटी डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरलेला फिरकीपटू एजाज पटेलला (Ajaz Patel) मायदेशात होणाऱ्या बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या (New Zealand) 13 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे. घरची परिस्थिती सामान्यत: सीमर्ससाठी अनुकूल असल्याने, किवी निवडकर्त्यांनी विशेषज्ञ फिरकीपटूची निवड केली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now