IND vs PAK: 'आता काय त्यांच्याशी भांडू? हे क्रिकेट आहे, युद्ध नाही,' भारत-पाकिस्तान संघर्षावर हरिस रौफचं वक्तव्य, पहा व्हिडिओ

ज्यामध्ये तो भारत-पाकिस्तान संघर्षाबद्दल वक्त्वय केले आहे. पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात पत्रकार परिषदेदरम्यान हारिस रौफला विचारण्यात आले की, “आता भारत-पाक सामन्यांमध्ये पूर्वीसारखी आक्रमकता दिसत नाही...

आशिया चषकाच्या सुपर-4 टप्प्यात भारताने पाकिस्तानला एकतर्फी पराभव दिला होता. या सामन्यात पाकिस्तानी संघाचे खेळाडूही जखमी झाले. ज्यात वेगवान गोलंदाज हरिस रौफचाही (Haris Raudf) समावेश आहे. नुकताच हरिसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भारत-पाकिस्तान संघर्षाबद्दल वक्त्वय केले आहे. पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात पत्रकार परिषदेदरम्यान हारिस रौफला विचारण्यात आले की, “आता भारत-पाक सामन्यांमध्ये पूर्वीसारखी आक्रमकता दिसत नाही, जी वेगवान गोलंदाज पूर्वी करत असत.” या प्रश्नावर रौफ म्हणाला, “मग मी त्यांच्याशी का भांडू, ते क्रिकेट खेळत आहेत, थोडे युद्ध सुरू आहे. आक्रमकता नक्कीच आहे. इतरांनी विश्वास ठेवावा किंवा न ठेवो, आमचा विश्वास आहे की आम्ही सर्वोत्तम संघ आहोत. आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही याची आम्हाला पर्वा नाही."

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)