IPL Auction 2025 Live

ICC Spirit of Cricket Award 2021: न्यूझीलंडच्या Daryl Mitchell याला मिळाला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार, जाणून घ्या असे काय केले

न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डॅरिल मिशेल अबुधाबी येथे इंग्लंड विरुद्ध ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 उपांत्य सामन्यात दाखवलेल्या खेळाडूवृत्तीमुळे ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. डॅनियल व्हिटोरी, ब्रेंडन मॅक्युलम आणि केन विल्यमसन यांच्या पावलावर पाऊल ठेवत मिशेल हा पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरला आहे.

डॅरिल मिशेल (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार सलामीवीर डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) अबुधाबी येथे इंग्लंड (England) विरुद्ध ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 उपांत्य सामन्यात दाखवलेल्या खेळाडूवृत्तीमुळे ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. 10 नोव्हेंबर 2021 रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे इंग्लंड विरुद्ध हायव्होल्टेज टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत एक धाव घेण्यास नकार दिल्याबद्दल मिशेलने पुरस्कार जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)