New Zealand vs Netherlands Live Score, World Cup 2023: नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, 17 षटकांत न्युझिलंडची धावसंख्या 90/1
आजच्या सामन्यासाठी केन विल्यमसन फिट नाही, टॉम लॅथम नेतृत्व करेल.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा सहावा सामना आज न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड यांच्यात खेळला जात आहे. न्यूझीलंडने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा 9 विकेटने पराभव केला. आता टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडची विजयी मालिका सुरू ठेवण्यासाठी सोमवारी हैदराबादमध्ये नेदरलँडशी सामना होईल. दुसरीकडे, नेदरलँडला त्यांच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 81 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत नेदरलँड्स या सामन्यात आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः लॉकी फर्ग्युसनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन झाले आहे. आजच्या सामन्यासाठी केन विल्यमसन फिट नाही, टॉम लॅथम नेतृत्व करेल.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कप्तान/कर्णधार), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लाइन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
ट्विट पहा: