IPL Auction 2025 Live

Rachin Ravindra Century: बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडची धावसंख्या 310 पार, रचिन रवींद्रने ठोकले झंझावती शतक

रचिनने 124 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले दुसरे शतक पूर्ण केले. यासह न्यूझीलंडने 289 धावांची आघाडी घेतली आहे.

Rachin Ravindra (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. रचिन रवींद्रने बेंगळुरू कसोटी सामन्यात शतक झळकावले. रचिनने 124 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले दुसरे शतक पूर्ण केले. यासह न्यूझीलंडने 289 धावांची आघाडी घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)