Sri Lanka vs New Zeland 2nd Test Day 3 Live Score Update: प्रभात जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे लोटांगण, अवघ्या 88 धावांवर संपूर्ण संघ तंबूत; श्रीलंकाने घेतली 514 धावांची आघाडी

शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला. न्यूझीलंडने 88 धावांवर 10 विकेट गमावल्या. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने 6 बळी घेतले आहेत.

Prabhat Jaysurya (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला. न्यूझीलंडने 88 धावांवर 10 विकेट गमावल्या. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने 6 बळी घेतले आहेत. श्रीलंकेला 514 धावांची आघाडी मिळाली आहे. न्युझीलंडचा संघ पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement