NZ Beat PAK 2nd T20: न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 21 धावांनी केला पराभव, गोलंदाजाचा घातक मारा

पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 194 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्फोटक सलामीवीर फिन ऍलनने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली.

NZ Team (Photo Credit - Twitter)

NZ vs PAK 2nd T20: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 14 जानेवारी रोजी खेळला गेला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 21 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आगामी टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 194 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्फोटक सलामीवीर फिन ऍलनने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 173 धावांवरच गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 66 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: IND vs AFG 2nd T20 Live Streaming: इंदूरमध्ये मालिका काबीज करण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह, घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now