New Zealand Beat India: पहिल्या टी-20 मध्ये न्यूझीलंडने केला भारताचा 21 धावांनी पराभव, सुंदरची झंझावाती खेळी गेली वाया

भारताकडून सूर्यकुमार यादवने 47 आणि वॉशिंग्टन सुंदरने 50 धावा केल्या. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st T20: पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 52 आणि डॅरिल मिशेलने नाबाद 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 47 आणि वॉशिंग्टन सुंदरने 50 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लोकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना 29 जानेवारी रोजी लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement