New Team India Jersey: भारतीय संघाला मिळणार नवीन जर्सी; Adidas ने लाँच केले Test, ODI आणि T20I साठी नवीन किट
आदिदास टीम इंडियाच्या जर्सी आणि किटचा प्रायोजक बनला आहे. दरम्यान, कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी, एक नवीन जर्सी समोर आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या फायनलला फक्त एक आठवडा बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. त्याआधी टीम इंडियाची पांढरी जर्सी बदलली आहे. आदिदास टीम इंडियाच्या जर्सी आणि किटचा प्रायोजक बनला आहे. दरम्यान, कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी, एक नवीन जर्सी समोर आली आहे. ही नवी जर्सी परिधान करून भारतीय संघ 7 जून रोजी मैदानात उतरेल. अशाप्रकारे चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आदिदासने सोशल मिडियाद्वारे तिन्ही फॉरमॅटसाठी नवीन डिझाइन केलेली टीम इंडिया जर्सी जारी केली आहे. (हेही वाचा: WTC Final 2023: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची तयारी सुरू, टीम इंडियाचा जोरदार सराव; व्हिडिओ पहा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)