New Cricket Rules: ‘मंकडींग’ नियमात बदल झाल्यावर वीरेंद्र सेहवागने घेतली Ashwin ची फिरकी, म्हणाला- ‘आता तर पूर्ण स्वातंत्र्य’ (See Post)
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) क्रिकेटच्या नियमात बदल करून “अनुचित खेळ” विभागातून ‘मंकडींग’ हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविचंद्रन अश्विनचे अभिनंदन करताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मजेदार पोस्ट शेअर केली. सेहवागने सोशल मीडियावर भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनची फिरकी घेतली. अश्विनने आयपीएल 2019 दरम्यान ‘मंकडींग’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने बाद केले होते.
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) क्रिकेटच्या नियमात बदल करून “अनुचित खेळ” विभागातून ‘मंकडींग’ हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविचंद्रन अश्विन याची फिरकी घेताना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मजेदार पोस्ट शेअर केली. अश्विनने आयपीएल 2019 दरम्यान ‘मंकडींग’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने बाद केले होते. आता, नवीन नियम लागू झाल्यावर सेहवागने खुशीने अश्विनला त्याचा सहकारी जोस बटलरसह ‘मंकडींग’ करण्याचा कट रचण्याचा सल्ला दिला कारण दोन्ही खेळाडू आगामी आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)