Netherlands Beat United States, 6th T20I Match Scorecard: अटीतटीच्या सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेचा 4 धावांनी केला पराभव, तिरंगी मालिकेवर केला कब्जा; सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पाहा

नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील त्रिकोणी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुवेस्टीजन येथे खेळवला गेला. या सामन्यात नेदरलँडसे अमेरिकेचा 4 धावांनी पराभव केला आहे.

USA vs NED (Photo Credit - X)

Netherlands National Cricket Team Beat United States National Cricket Team: नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील त्रिकोणी मालिकेतील सहावा टी-20 सामना आज म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुवेस्टीजन येथे खेळवला गेला. या सामन्यात नेदरलँडसे अमेरिकेचा 4 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, सहाव्या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या नेदरलँड संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 132 धावा केल्या. नेदरलँड्ससाठी स्टार अष्टपैलू रायन क्लेनने नाबाद 36 धावांची शानदार खेळी केली. रायन क्लेनशिवाय मॅक्स ओ'डॉडने 27 धावा केल्या. दुसरीकडे, अमेरिकेसाठी हरमीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. हरमीत सिंगशिवाय जसदीप सिंगने दोन विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी अमेरिकेच्या संघाला 20 षटकात 133 धावा करायच्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेचा संघ 20 षटकात सर्वबाद 128 धावा करु शकला. अमेरिकेसाठी स्टार फलंदाज अँड्रिस गूसने 44 धावांची सर्वोत्तम खेळी केली. अँड्रिज गुसशिवाय सलामीवीर सैतेजा मुक्कामल्लाने 24 धावा केल्या. नेदरलँड्सकडून आर्यन दत्तने सर्वाधिक तीन बळी घेतले. आर्यन दत्तशिवाय डॅनियल डोरमने दोन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now