T20 World Cup 2024: नेपाळने टी-20 विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, 'या' खेळाडूकडे देण्यात आली संघाची कमान

ओमानमध्ये झालेल्या एसीसी प्रीमियर चषक सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती त्यांचा नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे

Nepal Announced Squad for T20 WC 2024: जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) बहुतांश संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. नेपाळनेही बुधवारी संघ जाहीर केला. नेपाळ संघाचे कर्णधारपद रोहित पौडेलकडे (Rohit Paudel) असेल. ओमानमध्ये झालेल्या एसीसी प्रीमियर चषक सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती त्यांचा नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू कीर्तिपूरमध्ये वेस्ट इंडिज अ संघाविरुद्धही सामना खेळत आहेत. एका षटकात 6 षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या या खेळाडूचा नेपाळ संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू दीपेंद्र सिंग ऐरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. एरीने एप्रिलमध्ये कतारविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारून विश्वविक्रमाची बरोबरी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड

Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात

AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले

SL vs NZ 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा डाव 178 धावांवर गारद, मॅट हेन्रीने न्यूझीलंडसाठी केली घातक गोलंदाजी; पाहा स्कोरकार्ड