Bangladesh Beat Afghanistan: बांगलादेशने अफगाणिस्तानचा सहा विकेट्स राखून केला पराभव, नझमुल हुसेन आणि मेहदी हसनने झळकावले अर्धशतक

प्रत्युत्तरात बांगलादेशने 34.4 षटकांत 4 गडी गमावत 158 धावा करून सामना जिंकला.

शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मेहदी हसन मिराझच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ 37.2 षटकात 156 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 34.4 षटकांत लक्ष्य गाठले. बांगलादेशच्या या विजयाचा हिरो होता मेहदी हसन मिराज. मेहदीने प्रथम गोलंदाजीत तीन बळी घेतले आणि नंतर फलंदाजीत 57 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)