Watch Video: नॅथन लिऑनने सामन्यादरम्यान पंतला आयपीएल लिलावाबाबत विचारला प्रश्न, मजेदार व्हिडिओ झाला व्हायरल
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. या सामन्यादरम्यान आयपीएल 2025 मेगा लिलाव देखील होणार आहे, ज्याची तारीख 24 आणि 25 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
IND vs AUS 1st Test 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक 4 बळी घेतले. या सामन्यादरम्यान आयपीएल 2025 मेगा लिलाव देखील होणार आहे, ज्याची तारीख 24 आणि 25 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. याबाबत, पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लिऑनने आणि ऋषभ पंत यांच्यात संवाद पाहायला मिळाला. ऋषभ पंत फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करताना नॅथन लिऑन त्याच्यासमोरून गेला. यादरम्यान लिऑनने पंतला विचारले की, तू मेगा ऑक्शनमध्ये कुठे जाणार आहेस? ज्याला उत्तर देताना पंत म्हणाला की, काही कल्पना नाही. म्हणजेच आयपीएल मेगा लिलावात तुम्हाला कोणत्या संघासोबत जायचे आहे, हे नॅथनला विचारायचे होते. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्सने यावेळी पंतला सोडले आहे, त्यानंतर हा यष्टीरक्षक फलंदाज मेगा लिलावाचा भाग आहे. सर्व फ्रँचायझींच्या नजरा पंतवर खिळल्या आहेत.
IPL AUCTION TALK IN BGT 😄🔥
- "Where are you going in the IPL auction"?
Rishabh Pant - "No Idea". pic.twitter.com/qbpQ2movED
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

