WPL 2024 Points Table: मुनी आणि लॉरा यांच्या जबरदस्त भागीदारीमुळे गुजरातला मिळाला पहिला विजय, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती
प्रत्युत्तरात आरसीबीला आठ गडी गमावून केवळ 180 धावा करता आल्या.
WPL 2024 Points Table: महिला प्रीमियर लीगच्या 12व्या (WPL 2024) सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 19 धावांनी विजय (GG Beat RCB) मिळवला. बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील संघाने मंधानाच्या आर्मीविरुद्ध लीगमधील पहिला विजय नोंदवला. मात्र, गुजरातच्या या विजयामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला आठ गडी गमावून केवळ 180 धावा करता आल्या. या सामन्यात जॉर्जिया वेअरहॅम व्यतिरिक्त कोणतीही महिला फलंदाज आरसीबीसाठी विशेष काही दाखवू शकली नाही. तिने 22 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. मात्र, तिला या डावाचे अर्धशतकात रूपांतर करता आले नाही. (हे देखील वाचा: IND vs ENG 5th Test Live Streaming: शेवटच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)