Rajasthan Beat Mumbai: हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने केली विजयाची हॅट्ट्रिक, रियान पराग चमकला

या सामन्यात राजस्थाने मुंबईचा सहा विकेटसने पराभव केला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे तर राजस्थानने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे.

Rajasthan Beat Mumbai: हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने केली विजयाची हॅट्ट्रिक, रियान पराग चमकला

MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात राजस्थाने मुंबईचा सहा विकेटसने पराभव केला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे तर राजस्थानने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. तत्तपुर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईने राजस्थानसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानने 15.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून रियान परागने शानदार खेळी केली. रायनने 39 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, या खेळीत रायनने 5 चौकार आणि 3 शानदार षटकार ठोकले. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना आकाश मधवालने सर्वाधिक 3 बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).