MI vs SRH, IPL 2023: हैद्राबाद येथील टिळक वर्माच्या घरी जेवणासाठी पोहोचले मुंबई इंडियन्सचे खेळाडू, फोटो आला समोर
17 एप्रिललाच एमआयचा संपूर्ण संघ हैदराबादला या सामन्यासाठी पोहोचला होता.
आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन (SRH vs MI) यांच्यात होणार आहे. हैदराबादचे घरचे मैदान असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 17 एप्रिललाच एमआयचा संपूर्ण संघ हैदराबादला या सामन्यासाठी पोहोचला होता. दरम्यान, संघाचा युवा फलंदाज टिळक वर्माने (Tilak Verma) त्याच्या घरी खास मेजवानी आयोजित केली होती, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वाखाली संघातील सर्व लोक सहभागी झाले होते. टिळक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर डिनरनंतरचे काही फोटो शेअर केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)