Hardik Pandya New Mumbai Indians Captain: आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार; रोहित शर्माला पदावरून हटवले
रोहित 2013 पासून संघाचा कर्णधार होता. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.
Mumbai Indians Captain in IPL 2024: आयपीएल 2024 (IPL 2024) च्या आधी, मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघाला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्माला फ्रँचायझीने त्याच्या पदावरून हटवले आहे. रोहित 2013 पासून संघाचा कर्णधार होता. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिक नुकताच गुजरात टायटन्सच्या ट्रेडमध्ये पुणे मुंबई इंडियन्समध्ये आला होता. याआधी तो 2015 ते 2021 पर्यंत मुंबईचा भाग होता. 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने प्रथमच विजेतेपद पटकावले होते. 2022 च्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिकला सोडले होते, पण 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. (हेही वाचा: Year Ender 2023: रिंकूच्या 5 षटकारांपासून ते यशस्वीच्या सर्वात वेगवान अर्धशतकापर्यंत, आयपीएल 2023 मध्ये झाले हे आश्चर्यकारक विक्रम)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)