MS Dhoni Surgery Successful: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; लवकरच मिळणार डिस्चार्ज

चेन्नई सुपर किंग्जला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने सोमवारी अंतिम फेरीनंतर अहमदाबादहून थेट मुंबई गाठली. शस्त्रक्रियेबाबत त्याने प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ परडीवाला यांचा सल्ला घेतला होता.

MS Dhoni (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या डाव्या गुडघ्यावर गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्जला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने सोमवारी अंतिम फेरीनंतर अहमदाबादहून थेट मुंबई गाठली. शस्त्रक्रियेबाबत त्याने प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ परडीवाला यांचा सल्ला घेतला होता. हे डॉक्टर बीसीसीआयच्या वैद्यकीय पॅनेलमध्ये देखील आहेत व त्यांनी ऋषभ पंतसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये धोनीच्या गुडघ्याचे यशस्वी ऑपरेशन झाले. आता तो बरा असून एक-दोन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळेल. यानंतर धोनी काही दिवस विश्रांती घेईल. पुढच्या आयपीएलपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी त्याला पूर्ण वेळ आराम मिळेल अशी आशा आहे. धोनी यंदाचा संपूर्ण हंगाम डाव्या गुडघ्यावर पट्टी बांधून खेळला. (हेही वाचा: New Team India Jersey: भारतीय संघाला मिळणार नवीन जर्सी; Adidas ने लाँच केले Test, ODI आणि T20I साठी नवीन किट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now