New Team India Jersey: भारतीय संघाला मिळणार नवीन जर्सी; Adidas ने लाँच केले Test, ODI आणि T20I साठी नवीन किट

आदिदास टीम इंडियाच्या जर्सी आणि किटचा प्रायोजक बनला आहे. दरम्यान, कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी, एक नवीन जर्सी समोर आली आहे.

New Team India Jersey: भारतीय संघाला मिळणार नवीन जर्सी; Adidas ने लाँच केले Test, ODI आणि T20I साठी नवीन किट
New Team India Jersey

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या फायनलला फक्त एक आठवडा बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. त्याआधी टीम इंडियाची पांढरी जर्सी बदलली आहे. आदिदास टीम इंडियाच्या जर्सी आणि किटचा प्रायोजक बनला आहे. दरम्यान, कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी, एक नवीन जर्सी समोर आली आहे. ही नवी जर्सी परिधान करून भारतीय संघ 7 जून रोजी मैदानात उतरेल. अशाप्रकारे चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आदिदासने सोशल मिडियाद्वारे तिन्ही फॉरमॅटसाठी नवीन डिझाइन केलेली टीम इंडिया जर्सी जारी केली आहे. (हेही वाचा: WTC Final 2023: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची तयारी सुरू, टीम इंडियाचा जोरदार सराव; व्हिडिओ पहा)

 

View this post on Instagram

 

A post shared by adidas India (@adidasindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2023 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).