Dhoni Indian Sanskar Video: महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह पोहोचला आपल्या मूळ गावी; पाया पडून घेतले मोठ्यांचे आशीर्वाद (Watch)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तब्बल 20 वर्षांनंतर बुधवारी त्याच्या मूळ गावी ल्वाली येथे पोहोचला. इथे गावकऱ्यांनी धोनीचे जल्लोषात स्वागत केले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तब्बल 20 वर्षांनंतर बुधवारी त्याच्या मूळ गावी ल्वाली येथे पोहोचला. इथे गावकऱ्यांनी धोनीचे जल्लोषात स्वागत केले. या ठिकाणी त्याने पत्नी साक्षीसोबत गावातील मंदिरांमध्ये पूजा केली आणि वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी वडीलधाऱ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले, तसेच सर्वांची प्रेमाने चौकशी केली. साक्षीने गावातील महिलांशीही खूप गप्पा मारल्या. धोनीने गावातील तरुण व मुलांना क्रिकेटच्या टिप्स देण्यात सुमारे अडीच तास घालवले. सध्या याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अल्मोडा जिल्ह्यातील जैती तहसीलमधील ल्वाली हे महेंद्रसिंग धोनीचे वडिलोपार्जित गाव आहे. मंगळवारी नैनितालला पोहोचलेला माही बुधवारी सकाळी 11.45 वाजता पत्नी साक्षीसह त्याच्या मूळ गावी पोहोचला. (हेही वाचा: World Cup 2023 Final: अहमदाबाद येथे खेळला जाणार आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना; PM Narendra Modi उपस्थित राहण्याची शक्यता- Reports)