Mohammed Shami चे आले वादळ, 'या' संघाविरुद्ध केली धडाकेबाज फलंदाजी; पाहा व्हिडिओ
9 डिसेंबर रोजी बंगाल आणि चंदीगड यांच्यात सामना झाला होता. शमी या सामन्यात गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मात्र त्याने आपल्या संघासाठी शानदार फलंदाजी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Syed Mushtaq Ali Trophy 2024: मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy 2024) त्याचा दबदबा पाहायला मिळत आहे. 9 डिसेंबर रोजी बंगाल आणि चंदीगड (BEN vs CDG) यांच्यात सामना झाला होता. शमी या सामन्यात गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मात्र त्याने आपल्या संघासाठी शानदार फलंदाजी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमीने चंदीगडविरुद्ध तुफानी खेळी केली. या सामन्यात बंगालच्या एकाही प्रमुख फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पण शमीने आपल्या फलंदाजीने कमाल केली. शमीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 188.23 होता. शमीने आपल्या खेळीने बंगालला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)