Mohammed Shami चे आले वादळ, 'या' संघाविरुद्ध केली धडाकेबाज फलंदाजी; पाहा व्हिडिओ

9 डिसेंबर रोजी बंगाल आणि चंदीगड यांच्यात सामना झाला होता. शमी या सामन्यात गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मात्र त्याने आपल्या संघासाठी शानदार फलंदाजी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Mohammed Shami चे आले वादळ, 'या' संघाविरुद्ध केली धडाकेबाज फलंदाजी; पाहा व्हिडिओ
Mohammed Shami (Photo Credit - X)

Syed Mushtaq Ali Trophy 2024: मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy 2024) त्याचा दबदबा पाहायला मिळत आहे. 9 डिसेंबर रोजी बंगाल आणि चंदीगड (BEN vs CDG) यांच्यात सामना झाला होता. शमी या सामन्यात गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मात्र त्याने आपल्या संघासाठी शानदार फलंदाजी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमीने चंदीगडविरुद्ध तुफानी खेळी केली. या सामन्यात बंगालच्या एकाही प्रमुख फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पण शमीने आपल्या फलंदाजीने कमाल केली. शमीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 188.23 होता. शमीने आपल्या खेळीने बंगालला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).