IND vs PAK ICC Champions Trophy 2025: मोहम्मद शमीच्या नावे लाजीरवाणा विक्रम; एकदिवसीय सामन्यात एका षटकात पाच वाइड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पाचवा सामना आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या नावावर एक नको असलेला विक्रम नोंदवला आहे.

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या नावावर एक नको असलेला विक्रम नोंदवला आहे. मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यात एका षटकात पाच वाइड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पाकिस्तानच्या डावाच्या पहिल्या षटकात, मोहम्मद शमीने सलामीवीर बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांना 11 चेंडूंचा षटक टाकला. ज्यामध्ये त्याने पाच वाईड टाकले.

मोहम्मद शमीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now