Mohammad Siraj Records: मोहम्मद सिराजने पहिल्याच कसोटीत घातला धुमाकूळ, कपिल देव आणि झहीर खानच्या 'या' खास क्लबमध्ये झाला सामील
सिराजला त्याच्या चमकदार कामगिरीबद्दल बक्षीसही मिळाले आणि आता तो झहीर खान-कपिल देव सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा मोहम्मद सिराज हा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे.
IND vs BAN 1st Test: मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज संपूर्ण डावात अस्वस्थ दिसले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिराजने 9 षटकांत मेडनसह अवघ्या 14 धावांत तीन बळी घेतले होते. सिराजला त्याच्या चमकदार कामगिरीबद्दल बक्षीसही मिळाले आणि आता तो झहीर खान-कपिल देव सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा मोहम्मद सिराज हा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याआधी मोहम्मद शमीने 2017 मध्ये श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. दुसरीकडे, संघाचा माजी अनुभवी गोलंदाज झहीर खानने 2007 आणि 2009 मध्ये पहिल्याच चेंडूवर तिलकरत्ने दिलशान आणि जावेद उमर यांना आपला बळी बनवले होते. दुसरीकडे टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी 1983, 1992 आणि 1993 मध्ये तीन वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय आबिद अलीने 1971 आणि 1973 मध्ये ही कामगिरी केली होती.
Tweet
Brilliant from Siraj as he gets his name amongst the likes of Kapil Dev and Zaheer Khan. ?#MohammedSiraj #BANvIND pic.twitter.com/ZcGS7rw3He
— Cricket.com (@weRcricket) December 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

