IND vs SL 2nd ODI: मोहम्मद सिराजचा संयम सुटला, थेट सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजावर काढला राग; व्हिडिओ झाला व्हायरल
सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजासमोर बाउन्सर मारला आणि त्यानंतर संताप व्यक्त केला
Mohammad Siraj Aggression: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs SL 2nd ODI) कोलंबोमध्ये सुरू आहे. ज्यामध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांना डावाच्या अखेरीस स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजासमोर बाउन्सर मारला आणि त्यानंतर संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वास्तविक, सिराज भारतासाठी डावातील 49 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने शेवटचा चेंडू श्रीलंकेचा फलंदाज अकिला धनंजयला मारला. तेव्हा सिराज त्याच्याकडे रोखून बघत काहीतरी बोलत होता. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजाने फारशी प्रतिक्रिया न देता वाद नाही घातला.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)