IND vs BAN 1st Test 2022 Day 2: लिटन दाससोबत झालेल्या वादावर मोहम्मद सिराजने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

प्रथम लिटन दासने काही ऍक्शन केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने लिटन दासला क्लीन बोल्ड केले. यानंतर विराट कोहलीनेही लिटन दासला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.

IND vs BAN 1st Test 2022 Day 2: लिटन दाससोबत झालेल्या वादावर मोहम्मद सिराजने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Photo Credit - Twitter

IND vs BAN 1st Test: भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटी (IND vs BAN 1st Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि बांगलादेशचा फलंदाज लिटन दास (Liton Das) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. प्रथम लिटन दासने काही ऍक्शन केले आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने लिटन दासला क्लीन बोल्ड केले. यानंतर विराट कोहलीनेही लिटन दासला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. या सामन्यातील ही पहिलीच घटना होती, जेव्हा दोन्ही देशांचे खेळाडू समोरासमोर दिसले होते. मात्र आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराज या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. सिराज म्हणाला, "मी फक्त लिटन दासला समजूतदारपणे खेळण्यास सांगितले, कारण हा टी-20 सामना नाही".

Tweet

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).